Wednesday, July 6, 2011

कविता माझी ... !!



अगम्य किंवा सुगम ...कधी मूर्त कि अमूर्त ..
शब्दातून जे मांडले ...माझ्या मनीचे आवर्त.. !!

संथ जलाशयापरी... नितळ से पारदर्शी ..
क्वचित विस्कटलेलं ..वादळ गरगरतं..!!

जाईजुई फुले कधी.. अल्लद हिंदकळली ..
वटवृक्षाची सावली.. कधी अपार घनगर्द ..!!

झुळझुळता झरा जणू.. उत्फुल्ल खळाळता ..
अन वैशाख वणवा.. सदा अंतर्यामी तृषार्त..!!

गूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची ..
शब्द शब्द माझे तरी......  अनुभूती तुमची सार्थ !!!
   


- भक्ती आजगावकर 



4 comments:

  1. गूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची ..

    ही जाणीव/नेणिव ही संपते आणि फक्त अनुभूती उरते. छान कविता केली आहे.

    ReplyDelete
  2. आता एखादी ट्युशन घावी लागणारे कविता कळण्यासाठी! :)
    गूढ साद अंतर्यामी.. जाणीव का नेणिवेची .. भारी!

    ReplyDelete
  3. धन्यवाद विनायक , मिलिंद अन अभिषेक ... :)

    आता मीच ट्युशन घेते... जरा सोपे सोपे लिहिण्याची :D

    ReplyDelete