Thursday, August 9, 2012

काहूर इंद्रियांचे ..!!
एक गच्च श्वास, रातराणी माझ्या हृदयात..
नितळ दरवळ रातीचा, काहूर काळ्या डोहात..!!

थेंब थेंब ओसंडे एकच प्याला जगण्याचा..
खारी चव या दु:खाची उचंबळे अंतरात..!!

सांडले आयुष्य सारे उघडल्या पापण्यात..
पृथ्वीव्यापी दु: माझे मावेना या नभात..!!

पलीकडील नाद येई, अनाहत चांदरात..
एक याद एक साद प्रतिसाद माझ्या उरात..!!

सुकुमार स्पर्शलेले निळेशार भवताल..
निराकार धार धरून जीवन रिक्त घटात..!!

गंध चव दृष्टी श्रवण स्पर्श या संवेदना..
भोग प्राक्तनाचे एकवटुनी मर्त्य देहात..!!

- भक्ती आजगांवकर

सुलेखन सौजन्य : निखील ... (अश्यातश्या कल्पना सांगून अन चारपाचदा काम करायला लावूनसुद्धा ना कंटाळता करून देणे हे सौजन्य... अन हे असे करायला लागणे हे त्यांचे प्राक्तन :P)