परब्रम्ह हे भक्तांसाठी.. मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव .. जणू कि पुंडलिकाचा...
कानडा राजा पंढरीचा ... !!
आम्हा साऱ्या संगीतभक्तांसाठी सुद्धा हा सूरतालाचा पुंडलिक जणू बाबूजींच्या रुपात उभा राहिला... त्यांच्या स्मृतीदिनी (२५ जुलै १९१९ - २९ जुलै २००२) त्यांच्या गीतांचा अमृतकलश मनामनात हिंदकळला नाही तर नवलच...
भूपाळी, भक्तीगीत, अभंग, बालगीत, भावगीत, हळुवार प्रेमगीत, विरहगीत, करुणगीत, लावणी, वीरश्रीपूर्ण युद्धगीत आणि प्रतिरामायण जणू असे गीत रामायण !!! अश्या साऱ्याच चित्रपट संगीत अन सुगम संगीत यात संगीत दिग्दर्शन अन गायन करून हिंदी अन मराठी दोन्ही रसिकांच्या मनात अजरामर झालेले बाबूजी...
तर हा ह्ळूवार स्वराचा, अवीट गोडीच्या चालींचा अन शाश्वत आनंदाचा "ज्योती कलश" या पुढे ही पिढ्यानपिढ्या असाच "छलकत" राहणार यात काही शंका नाही...
तुमचे कौतुक म्हणजे पुन्हा ज्योतीने तेजाची आरती ..!!
सूर तुमचे, चाल तुमची अन आवाज ही तुमचा... आमची फक्त अंजली .. भावनांची, स्मृतींची अन श्रद्धेची !!!
- भक्ती आजगावकर
छायाचित्र आंतरजालाहून साभार!! ध्वनीचित्रफीत युट्यूबवरुन साभार!!
छायाचित्र आंतरजालाहून साभार!! ध्वनीचित्रफीत युट्यूबवरुन साभार!!

आमचीही अंजली...
ReplyDeleteधन्यवाद इतक्या सुरेख लेखना बददल
भावना ज्या पद्दतीने शब्दांकित केल्यात त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील
ReplyDeleteसुंदर शब्दात आदरांजली दिलीत बाबुजीना ...
ReplyDeleteधन्यवाद अभिषेक, प्रदीप अन दवबिंदू ...
ReplyDeleteखरेच छोटासा प्रयत्न बाबूजींना आठवण्याचा ... गोड मानून घेतलात.. आनंद आहे !!!
फारच अप्रतिम लिखाण तूमचे शब्दमल्हार बरसावा
ReplyDeleteतसा शब्दांचे मोती बरसतात मनावर
मी स्वतः लिहितो आणि तुमच्यासारख्या लेखकांच्या शोधत असतो
ज्यांच्या लेखणीतून साक्षात सरस्वती प्रसन्न उमटते… धन्य झालो
माझा मेल आयडी देतोय आपले लेखन असेच ठेवा
बाबूजींच वाचून उत्तम माहिती
mailsuyogjoshi@gmail.com