Tuesday, August 2, 2011

"कॅफे कॉफी डे"


सार्‍या कॉफीप्रेमी अन "कॅफे कॉफी डे" प्रेमींसाठी समर्पित ....  

अलगद निसटुनी डोळ्यामधुनी हृदय तरंगे कॉफी वरती  
कितीक स्वप्ने आयुष्याची फेसावर उमलती न विरती !!!

गंध कडक हा एक्स्प्रेसो चा कडू घोटासह दु:ख जरी 
कॅपुचिनो ची सदैव सोबत साखर दुध न क्रीमसोबती !!! 

लॅंटे चा एक घोट मनस्वी गंध चव कॉफीची खरी 
पंचेद्रीयांनी उपभोगावी स्वर्गच जणू धरेवरती !!! 

अशी शिकवते एकच कॉफी जगण्याची रीत ही न्यारी 
माहोल "कॅफे कॉफी डे" चा मिठ्ठाससे क्षण स्मरती !!!  

- भक्ती आजगावकर


9 comments:

 1. हम्म, कॉफी प्रेम दिसतंय!
  कॅफे-लाते, कापुचीनो, कॅफे मोका... कॅफे-एस्प्रेस्सो! वाह! पाउस, आठवणी, गझल आणि माहोल!

  ReplyDelete
 2. पाउस, आठवणी, गझल आणि माहोल!

  जनाब... एक बहोतही ज़रूरी चीज़ भूल रहे हो...
  दोस्त भी तो चाहिए... वरना तो ये सब भी बेकार है !!!

  ReplyDelete
 3. आमच्या देशी जर्मनीत कॉफी हे राष्ट्रीय पेय आहे.
  मात्र माझ्या जर्मन पत्नीस सी सी डी मधील शीत कॉफी भयानक आवडते.
  तुमची कविता लाजवाब आहे.
  त्याने माझ्या सी सी डी च्या आठवणी ताज्या झाल्या.

  ReplyDelete
 4. स्वागत अन धन्यवाद निनाद :)

  ReplyDelete