एक दिवस असा छान उगवतो...
ट्रेन मध्ये वाऱ्याची खिडकी, ऐसपैस जागा अन हातात आवडीचे पुस्तक...
गाडी, क्षण अन आपले विचार .. सारेच एका दिशेत एका वेगात धावत असतात...
समांतर .....
जाणीवच नसते आपल्याला..
आजूबाजूच्या कोलाहलाची.. गर्दीची...किती स्टेशन्स मागे गेले त्याची ..
आजूबाजूच्या कोलाहलाची.. गर्दीची...किती स्टेशन्स मागे गेले त्याची ..
आपण मग्न असतो आपल्याच विश्वात ...
अन मग एक जादू होते...
अचानक कुठूनसा मोगरयाचा वेडा सुवास भरून टाकतो आपले भवताल ...
डझन दोन डझन गजरे घेऊन आलेली असते एक गजरे विकणारी बाई ...
अन तिच्या हातात ते गजरे घमघमत असतात...
अन तिच्या हातात ते गजरे घमघमत असतात...
वेडावून टाकणारा ... जुन्या आठवणी जागा करणारा.. मोगरा...
कधी देवाच्या पायाशी वाहिलेली मोजकी फुले.. कधीतरी आईच्या अंबाड्यावर माळलेला गजरा..
दिली-घेतलेली मोगऱ्याची अर्धोन्मीलित कळी...
दिली-घेतलेली मोगऱ्याची अर्धोन्मीलित कळी...
किती सुगंध मनात एकत्र जागवतो हा मोगरा...
मनात आठवणीचे तरंग उठवत अल्लद पुढे जाणारा..
मनात आठवणीचे तरंग उठवत अल्लद पुढे जाणारा..
मागचा पुढचा काही विचार न करता आपण विकत घेतो ते गजरे...
अन भरून घेतो अवघ्या श्वासात ... हुंगून घेतो भरभरून ...
पुन:प्रत्ययाचा आनंद घेत... विसावतो त्या क्षणावर .. अलवार ..
पुन:प्रत्ययाचा आनंद घेत... विसावतो त्या क्षणावर .. अलवार ..
अन मग पुढच्याच वळणावर नवीन बाई ... हातात सोनचाफा दाखवत...
आपण हसून दाखवतो तिला हातातले गजरे... अन हलकासा नकार...
आपण हसून दाखवतो तिला हातातले गजरे... अन हलकासा नकार...
कळत नाही तेव्हा...त्या क्षणाला... की कसला जीवघेणा नकार दिला असतो आपण स्वतःलाच !!
बाई पुढे सरकते... डब्बाभर हिंडून त्या फुलांचा सौदा करते...
अन आपला जीव वर खाली... पर्समधून नाणी काढून हातात खेळवत आपण नजर लावून असतो..
की कधी तिचे लक्ष जातेय... अन कधी मी चुकीची भरपाई करतेय ...
की कधी तिचे लक्ष जातेय... अन कधी मी चुकीची भरपाई करतेय ...
पण असे व्हायचेच नसते..
तिचे काम संपवून ती विसावते एका कोपऱ्यात... आवराआवर करून निवांत वारा खाते...
सगळी फुले निमूट तिच्या पिशवीत आपला गंध आवरून सावरून बसतात...
सगळी फुले निमूट तिच्या पिशवीत आपला गंध आवरून सावरून बसतात...
अन आपल्या हातातल्या नाण्यांना मग काडीची किंमत उरत नाही...
हिरमुसून परत जातात ते पर्स मध्ये....
हिरमुसून परत जातात ते पर्स मध्ये....
ओंजळभर मोगऱ्याचे गजरे घेऊन सुद्धा सोनचाफा बाजी मारून गेलेला असतो...
मनातला सल निवळता निवळत नाही...
मनातला सल निवळता निवळत नाही...
असे का होते.. तुमचे सुद्धा होते का असेच...
ता. क. : आपले स्टेशन येते... आपण उतरायला दरवाज्यापाशी जातो...
तिथे एक वेडा अर्धामुर्धा सोनचाफा टाकून गेलेली असते ती बाई...
तिच्या लेखी त्याला भाव नसतो येणार .. पैश्यात... :)
आपण उचलतो तो वेड्यासारखा ... तो अर्धामुर्धा चाफा अन पूर्ण वेडे आपण ...
येतो घरी एकमेकांना साथ करत.... खुशीत... :)