Sunday, June 12, 2011

नीलमयी!!







असीम गहिऱ्या निळ्याच्या मोहिनीत त्याची सखी होणे हे क्रमप्राप्तच ... 
त्याच निळाईचे हे गुणगान ..
त्याच्या सखीकडून...

नीलमयी!!

निळी सांज आणि निळा देह सारा
निळ्या गोकुळाशी हे नाते जडे ..!!
निळ्या पापणीतून निळे स्वप्न झरते
निळाईत पाऊल पुरते बुडे .. !!

निळ्या आसमंती निळे जलद झुलती
निळी रेघ जैसा नील पक्षी उडे ..!!
निळ्या बासरीची निळी धून वाहे
निळी जादू ऐसी ही कैसी घडे .. !!

निळाईत आता पुरते बुडावे
निळे श्वास आभास चोहीकडे ..!!
निळ्या अंतरंगी निळा शाम संगी
निळ्याची अशी भूल मजला पडे .. !!

- भक्ती आजगावकर



2 comments:

  1. सुरेख काव्य.....
    सोपे साधे पण अंतरंगाचा ठाव घेत अलगद मनात उतरले....त्या श्याम सखीचे मनोगत....

    ReplyDelete