We must Learn to walk alone ...!!
जीवनात किती वाटा किती प्रवाह येऊन मिळतात ..
एका उत्कट बेभान लाटेला आभाळ मोकळं पुढे जायला ...
क्षितिजावर रेंगाळणारे लखलखते तारे, अगणित नक्षत्रे आतुर आपल्याला कवेत घ्यायला..
सळसळत्या प्रवाहासोबत वाहत जातो आपण.. वेडावत जातो.. वागवत जातो अंगांगावर सूर्यास्ताचे अगणित वेडे रंग...
सोनेरी, केशरी, पोवळी, गुलाबी आणिक निळे जांभळे रंग नेऊन सोडतात एका गडद काळोखी छायेत...
या साऱ्याच वाटांवर सोबती नाही मिळत नेहमीच... म्हणूनच ... we must learn to walk alone ...!!!
बहराच्या जडभाराने झुकलेली गुलमोहराची फांदी खुणावते तेव्हा तो बहर अनुभवावा एकट्यानं ...
सहज वळणावर भेटावं रातराणीच्या सुगंधानं अन श्वासभर हुंगून घ्यावं ते ही एकट्यानं...
घरी जाताना अचानक क्षितिजावर सूर्याचे सहजी अस्त होणं समजून घ्यावं एकट्यानंच ...
दाटून येणारा आवंढा अन भिजू भिजू पाहणारे डोळे या सोबत मनात रुंजी घालणारं "थोडासा बादल थोडासा पानी... और इक कहानी ...दो नैना औsssर इक कहानी" या सोबत गहिवरून यावं तेही एकट्याने...
आणि एका क्षणी वेड्या सलीलसीमेवर उभं राहून जन्म मृत्यूची ओढाताण भोगावी ती ही एकट्याने.. फक्त एकट्यानेच !!!
" देखिये तो लगता है,
जिंदगी की राहों में इक भीड चलती है ...
सोचीये तो लगता है, भीड मे है सब तनहा !!!
देखिये तो लगता है...
जितने भी ये रिश्ते है.. कांच के खिलोने है,
पल मे टूट सकते है...
इक पल मे हो जाये... कौन जाने कब तनहा !!!
देखिये तो लगता है,
जैसे ये जो दुनिया है.. कितनी रंगी महफिल है..
सोचीये तो लगता है,
कितना गम है दुनिया मे.. कितना जख्मी हर दिल है
वो जो मुस्कुराते थे,
जो किसी के ख्वाबोंमे अपने पास पाते थे
उनकी नींद टूटी है
और वो है अब तनहा ..."
- One of the master pieces from Jawed Akhtar
शेवटी ज्याचं त्याचं गाणं एकट्यानचं म्हणायचं.. उत्कटतेनं ओसंडून जगण्यावर असं प्रेम करायचं आणि आठवणींचा गोफ विणत राहायचं ... रिक्त मनात स्वतचं अस्तित्व सांभाळत... एकट्यानं !!!!
-हिंदी कविता सौजन्य : जावेद अख्तर (Title song of Hindi Serial तनहा )
-
- भक्ती आजगावकर
जैसे ये जो दुनिया है.. कितनी रंगी महफिल है..
सोचीये तो लगता है,
कितना गम है दुनिया मे.. कितना जख्मी हर दिल है
वो जो मुस्कुराते थे,
जो किसी के ख्वाबोंमे अपने पास पाते थे
उनकी नींद टूटी है
और वो है अब तनहा ..."
- One of the master pieces from Jawed Akhtar
शेवटी ज्याचं त्याचं गाणं एकट्यानचं म्हणायचं.. उत्कटतेनं ओसंडून जगण्यावर असं प्रेम करायचं आणि आठवणींचा गोफ विणत राहायचं ... रिक्त मनात स्वतचं अस्तित्व सांभाळत... एकट्यानं !!!!
-हिंदी कविता सौजन्य : जावेद अख्तर (Title song of Hindi Serial तनहा )
-
- भक्ती आजगावकर
सुंदर गं.
ReplyDeleteक्षितिजावर सूर्याचे सहजी अस्त होणं समजून घ्यावं एकट्यानंच ...आवडलं...
दु:ख भोगावं एकट्याने....सुख लुटावं सोबतीने....
...माझं आपलं उगाच ! :)
धन्यवाद अनघा.. :)
ReplyDelete"सुख लुटावं सोबतीने" हे आहेच ...पण "दु:ख भोगावं एकट्याने" असे नेहमी नाही हम्म .. इतके सारे बंध असताना सोबतीला... दु:ख पण हलके होऊन जाते न ...
:) लोभ असू द्यावा
भक्ती
अगदी खरं आहे. एकट्यानं निसर्गाजवळ जाण्यातही फार मजा आहे.
ReplyDelete@अनघाताई: दु:ख भोगावं एकट्याने....सुख लुटावं सोबतीने.... + १
अरे काय लिहिले आहेस तू अप्रतिम. अत्यंत सुंदर खूप भरून भरून येते. माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी जाणवल्या......
ReplyDeleteधन्नो प्रमाणे मला सुद्धा आवडले अनघाताई: दु:ख भोगावं एकट्याने....सुख लुटावं सोबतीने.... + १
धन्यवाद इंद्रधनू... :)
ReplyDeleteकल्पेश...
ReplyDeleteमनापासून धन्यवाद :)... आवडले तुला हे छान ..
बाकी तुझ्या मनातले... माझ्या मनातले... उत्तम सुंदर अश्या या सारया हृद्य गोष्टी न...मग हा झिम्मा रंगणारच :)
जिव्हाळ्याने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा !!!
khup chaan aahe ga ...aawadli mala
ReplyDeleteआभार अक्षय... !! :)
ReplyDeleteखरे आहे सखी,तुझ्या ह्या लेखात एक सत्य तू सुरेख मांडलस.प्रत्येकाला माहित असते कि,'अकेले आये हैं अकेले जाना है!'पण तरीही सोबत शोधत,असलेली सोबत जपत पुढे जात असतो."एकला चलो रे" हे सत्य आहे.तू म्हणतेस त्यात तथ्य आहे.हि जाणीव असणे आणि राहणे हे सोपे नाही पण ज्याने ह्यावर अंमल केला तो अचानक एकटेपणाच्या लाटेने हेलावून जाणार नाही.जावेदजी ह्याचे गीत पण आवडले...
ReplyDeleteYes, I do agree!!...............we must learn to walk alone,.......But I don't want to walk alone...!!
ReplyDelete>>जीवनात किती वाटा किती प्रवाह येऊन मिळतात ..
ReplyDeleteएका उत्कट बेभान लाटेला आभाळ मोकळं पुढे जायला ...
क्षितिजावर रेंगाळणारे लखलखते तारे, अगणित नक्षत्रे आतुर आपल्याला कवेत घ्यायला..
सळसळत्या प्रवाहासोबत वाहत जातो आपण.. वेडावत जातो.. वागवत जातो अंगांगावर सूर्यास्ताचे अगणित वेडे रंग...
सोनेरी, केशरी, पोवळी, गुलाबी आणिक निळे जांभळे रंग नेऊन सोडतात एका गडद काळोखी छायेत...
या साऱ्याच वाटांवर सोबती नाही मिळत नेहमीच... म्हणूनच ... we must learn to walk alone ...!!!
वाह वा ...काय लिहल आहेस.... जबरी एकदम ...
छान कम्पोज केलाय
ReplyDeleteहम्म.. सूर्यास्त आणि एकांत!
"पण ज्याने ह्यावर अंमल केला तो अचानक एकटेपणाच्या लाटेने हेलावून जाणार नाही.."
ReplyDeleteअगदी खरे श्रिया..
प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार :)
DhundiRaj...
ReplyDeleteI wish you never have to walk alone... :)
Hope you are surrounded by all family, friends, welwishers.... :)
दवबिंदू ....
ReplyDeleteतुमचं आमच्या पोस्टवरचं अस्तित्व आल्हाददायक बरं का...धन्यवाद !!!
धन्यवाद अभिषेक :) !!!
ReplyDeleteThat was so sweet. Excellent piece of writing.
ReplyDeleteIndia is a land of many festivals, known global for its traditions, rituals, fairs and festivals. A few snaps dont belong to India, there's much more to India than this...!!!.
visit here for India
अतिषय मंत्रमुग्ध करणारा अनुभव रचला आहेस तु शब्दांमध्ये !
ReplyDeleteसंकेत... धन्यवाद!!!
ReplyDeleteCherishing your presence on my blog... :) Welcome to Sakhi's world !!! :)
very nice one, aprateemm
ReplyDeleteactually , we must learn to walk alone...
धन्यवाद स्वप्नाली.. :)
ReplyDelete