Thursday, October 27, 2011

दिवाळी ...


दिवाळी ...
दिपवाळी .. दीपावली ... दिव्यांच्या ओळी  ... 
      प्रकाशाचा उत्सव ..
          ज्योतींचा महोत्सव ... 

किती उजळून निघतो सारा आसमंत .. लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी .... 
साध्या मातीची पणती ..पण तिचे इवलेसे मांगल्यमय तेज दूर करते पराकोटीचा अंधार ... 

अश्या अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली इक तळपती झेप ...
एक झळकती ज्योती शलाका ... एक मंद तेवणारी वात.. 
तिमिर दूर सारून सत्याचा, चांगुलपणाचा उजेड देणारा एक महान मंगलस्त्रोत ... 
चिमुकला पण आशादायी ..

हा आतला अंधार, निराशेचे गडद तिमिर ओलांडून आशेची वात उजळण्यास कारणीभूत होऊ दे ही इच्छा ... 
येणाऱ्या प्रत्येक अमावास्येत पुढच्या पौर्णिमेची आस मनात जागत राहू दे ही सदिच्छा... 
अन ही दिवाळी तुम्हा साऱ्यासाठी खूप खूप खूप आनंद ... सुख समृद्धी ...अन आंतरिक समाधान घेऊन येवो या शुभेच्छासह .... 


उजळली वात, फाकला प्रकाश 
उटण्याचा गंध भारले आकाश .. 
मांगल्य घेउनी आली ही दिवाळी 
जीवनास लाभो सुवर्ण तेजाची झळाळी!!! 

- भक्ती आजगावकर 

11 comments:

  1. सुंदर...फोटो आणि चार ओळी...जसं एखादं छोटंसं दिवाळीचं भेटकार्ड मिळावं. :)
    तुलाही दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! :)

    ReplyDelete
  2. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...फोटो आणि कविता दोन्ही मस्त आहेत..

    ReplyDelete
  3. दिवाळीचे भेटकार्ड :)
    खरेच ... :) तुम्हा सगळ्यांसाठी !!!

    दिवाळीच्या शुभेच्छा तुला सुद्धा अनघा !!!
    :)

    ReplyDelete
  4. धन्यवाद अपर्णा !!
    दिवाळीच्या खूप खूप खूप शुभेच्छा तुला ही... :)

    ReplyDelete
  5. सुंदर.....

    शुभ दीपावली :) :)

    ReplyDelete
  6. :)

    शुभ दीपावली सुहास...

    चैतन्याचे अगणित दिवे तेजाळू दे... अन जीवन प्रकाशमान होऊ दे !!!

    ReplyDelete
  7. सखी तुला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्यासाठी हे नवीन वर्ष आनंददायी,आरोग्यदायी असे आणि,नवीन आशा,स्वप्न घेऊन येवो अशी सदिच्छा!

    ReplyDelete
  8. खूप सुंदर लिहल आहेस आणि फोटोही एकदम झक्कास ... शुभेच्छा...!!!

    ReplyDelete
  9. khup chaan bhakti :-)
    -Suvarna

    ReplyDelete
  10. श्रिया, ओम , दवबिंदू अन सुवर्णा...

    शुभेच्छा अन कौतुकासाठी आभार ...
    तुम्हाला हि दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा ....

    ReplyDelete