Wednesday, October 12, 2011

कोजागिरी पौर्णिमा


"को जागर्ति ... को जागर्ति ??" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ... लक्ष्मीची चंचल पाऊले ऐकायला जागे राहणाऱ्या आशादायी मनुजाची ...


कोजागिरी पौर्णिमा ...
पूर्ण चंद्राचे कौतुक आणि उत्सव चांदण्यांचा ...
मोत्यासारख्या लख्ख प्रकाशात न्हायलेल्या रातीचा...
कुटुंबीय, आप्त अन मित्रांसोबत हसत खेळत गप्पा मारत केलेल्या जागरणाचा ...
शुभ्र चांदण्यात चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या नैवेद्याचा ..
आणि सगळ्यांसोबत घालवलेल्या या तास दोन तासाच्या मैफिलीचा ....
सोबत सुरेल आठवणीतल्या कवितांची ... भेंड्या लाऊन म्हटलेल्या चांदण्या रात्रीच्या गाण्यांची ..
पेटी वरल्या एखाद्या सुरावटीची अन ... उत्स्फूर्त अश्या टाळ्यांची सुद्धा...

....

पण.. अशी ही पहिलीच कोजागिरी नाही का...
दूर... एकांतात... आपल्या माणसांपासून दूर वेगळ्याच शहरात ...
आपल्याच आभाळात फुलून आलेल्या या पूर्ण चंद्राचे ..शरद पौर्णिमेचे कौतुक फक्त मनातल्या मनात...
आभाळ तेच... चांदणे तेच... चंद्र ही तोच... अन पौर्णिमा ही तीच..
पण घर... आपली गच्ची... आपली माणसे... अन कोजागिरीचा सोहळा ... हे सगळेच दूर...
फोन वर शुभेच्छा देता घेताना... वरकरणी हसून एखादा smily वाक्यात पेरताना ... स्वत:ला समजावणीचा सूर स्वत:चाच...
पण अंतर्यामी कोजागिरीची साद का अपूर्ण... का मनातल्या भावनांचे सावट या शुभ्र चांदण्यावर ही पडलेले..

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...
अपने रात की छत पर कितना तनहा होगा चांद... !!!शब्दसुरांच्या चांदण्याची अशी बरसात करून..कालच काळाच्या पुढे निघून गेलेले जगजीतजी यांची आठवण आल्याशिवाय ही रात्र सरत नाहीये.. गीत - गझलांची ही कोजागिरी मात्र पुढच्या कित्येक पिढ्यांवर अशीच बरसत राहील हे नक्की..
जगजीतजी...तुम्हाला चांदण्यांचीच श्रद्धांजली !!!


- भक्ती आजगावकर

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...

छायाचित्र आंतरजालाहून साभार!! ध्वनीचित्रफीत युट्यूबवरुन साभार!!


19 comments:

 1. super-nostalgia effect!!
  फार सुंदर ..

  ReplyDelete
 2. चांद बिना हर दिन यु बीता जैसे युग बीते
  मेरे बीना कीस हाल मी होगा कैसा होगा चांद
  असं जगजीत आधीच विचारून गेला ,
  आणि उत्तर पण त्यानेच दिलंय

  अपनी रातकी छत पर कितना तनहा होगा चांद
  तर आता असाच जगजीत विना "तनहा" असलेला ........

  ReplyDelete
 3. Thanks Anonymous and Pixodentist.. Welcome to Blog!!!

  ReplyDelete
 4. अक्षय न योग... धन्यवाद ... !!

  तनहा चांद... हम्म खरेच ओम ...

  ReplyDelete
 5. कुछ ऐसा है
  जो
  बहुत अच्छा लग रहा है...

  अभिवादन .

  ReplyDelete
 6. धन्यवाद दानिश ... !!
  Feel free to Explore blog :)

  Welcome!!

  ReplyDelete
 7. चंद्र पण हसत असेल जी पोस्ट वाचून... म्हणेल, काय राव भक्ती इतकी दिवस मी एकला होतो इथे, आता तू तिथे एकली... पण म्हणून काय तो नैवेद्य दाखवणारे का तुला, कोजागिरीचा! :)
  पोस्ट च्या सुरवातीलाच काय माहित का पण जगजीतची आठवण छू गयी... तुझ्या कडे जगजितच्या आठवणी तरी आहेत! तो चंद्र बिचारा अजूनही 'तनहा'च आहे... मग त्यास काय देस आणि काय परदेस!

  ReplyDelete
 8. Jagjit Singh's voice would silently sip into one's being, one's emotions elevated, and mixed its tincture, healing the scars.

  ReplyDelete
 9. अभिषेक :P
  कोजागिरीचा प्रसाद :)

  अन तनहा चंद्र... हे खरेच... सोबत करतो ती मात्र मोलाची

  ReplyDelete
 10. धन्यवाद स्वानंद, मिलिंदजी अन श्रिया ...

  लोभ असाच कायम असू द्यावा !!

  ReplyDelete
 11. Chichi...
  Indeed his magical voice heals many scars... even without letting know that its touching the pain!!!
  :)

  ReplyDelete