Saturday, June 25, 2011

थेंब..

दवापरी कधीतरी
विरघळूनी जायचे...
तत्पूर्वी एकदाच
कमलदली न्हायचे..!!

सावरुनी बैसता
जिणे व्हावे मोत्याचे ..
का अन किती क्षण
जगणे नाही मोजायचे ..!!

ओघ हा पाण्यासम
आस एक ही मनी..
एक घोट आयुष्याचा
तृषार्तास भिजवायचे..!!

थेंब व्हावा पावसाचा
अन दयार्द्र आसवाचा ..
करुणा मनी धरूनी
पुन्हा आकाशी भिडायचे..!!

- भक्ती आजगावकर
No comments:

Post a Comment