Tuesday, March 26, 2013

कुणा एकीने जमवलेली श्रद्धांजली ..


तो गेला...
एक वर्ष होतेय आज ...

तरी तो गेला तेव्हा थांबला नाही सूर्य
चंद्रानेही ढाळले नाही अश्रू रक्ताचे …
क्षणार्धात वीज नाही कोसळली ... फुलांनी टाकल्या नाहीत माना …
आवेगाने पृथ्वीची चाल नाही बदलली …

आत आत खोल वाटले होते तसे, थांबले नाही श्वास माझे …
तुझ्या जाण्याच्या कल्पनेनेच जशी थिजले होते … तशी कोसळले नाहीच मी ..

साऱ्या जगण्याची मदार तुझ्यावर असल्यागत आयुष्य धावून सुद्धा आले 
नाही अंगावर…

चालू राहिले तसेच दिवस रात्रीचे चक्र ...
अर्ध्य दिल्यागत सुखदु:खांचे कणकण झिरपणे चालूच आहे जगण्यात ..
ऊन सावलीचे अपरंपार प्रेम अजून सजवतेच आहे चंद्रफुलाची नक्षी..
एक फांदी मोडली तरी नवीन झाड नव्या फांदीची आस सोडली नाहीये पक्ष्यांनी ..

पण मग...
आत कुठेतरी ती व्याकूळ संध्या अजून जागी आहे..
सन्यस्त सुखांच्या काठी वळवाचा पाऊस भिजवतो आहे विदेही मनाला ..
कितीही अडगळीत लपण्याचा प्रयत्न केला तरी....
गर्द वनराईचा हलके हलके दाटून येणारा अंधार अजून बुडवतोच आहे..

आता कळले ...
सृजनाच्या पैलतीरावर जोडलेली आकाशाची नाळ झाला होतास तू..
अनावर कालिंदीतटाच्या राधेचा असीम शृंगार ..
आणि, 

तुझ्या जाण्याने माझा कृष्ण माझा सखा हरपलाय  !!!

- भक्ति आजगांवकर

वाचनीय अजून काही...

कविता
कविता माझी ... !!
नीलमयी!!

10 comments:

 1. सुंदर..
  -कृष्ण सखा

  ReplyDelete
 2. :)

  ग्रेसना जाऊन वर्ष झाले काल ...

  ReplyDelete
 3. माझा नाही विश्वास बसत... एक वर्ष यावर तर नक्कीच नाही
  विचारणीय श्रद्धांजली आहे, तुम्ही खरंच मिस करता त्यांना हे जाणवत

  ReplyDelete
 4. माझा नाही विश्वास बसत ... अजूनही (की ग्रेस आपल्यात नाही...)
  तसही जोपर्यंत आपल्यात ग्रेस आहे, ग्रेस आपल्यातच आहेत...
  अस म्हणायचं होत मला...

  ReplyDelete
 5. अप्रतिम .. खूपच सुंदर...

  ReplyDelete
  Replies
  1. :)
   धन्यवाद सागर !!!

   Delete
 6. खूपच छान. स्पर्शुन जाणारं लेखन!

  ReplyDelete