Sunday, September 30, 2012

दिवस गणपतीचे.. दिवस कोकणाचे - भाग १

दिवस पहिला ...प्रवासाचा ...
रोजचे रुटीन मागे टाकून झुकझुक गाडीने...
आपल्या कोकण रेल्वेने, आपल्या कोकणात परतण्याचा ..
वळणावळणाने ट्रेनच्या पुढे धावणाऱ्या समांतर track चा...
हिरव्यागार घनदाट गच्च सोबतीचा ...अन दूर दिसणाऱ्या मंदिराचा, कौलारू घरांचा ...

एक दिवस ..
सगळ्या भावाबहिणीसोबतचा...
मस्तीचा.. न संपणाऱ्या गप्पांचा ... गाडीभर फिरून येण्याचा...
मधल्या उघड्या दरवाज्यावर उनाड वारा पिण्याचा ..
कोकण रेलवे स्पेशल वेज बिर्याणीचा ...
थोडा कॅमेरयाचा अन् थोडा मॉडेलिंगचा...एक दिवस ...
आपल्या मालकीच्या आपल्या खिडकीचा..
त्यातल्या धावत्या चित्रासकट पुढे उलगडणाऱ्या प्रवासाचा...
गाडीपेक्षाही अधिक वेगात धावणाऱ्या मनाचा...
अन तरीही मागे सोडून आलेल्या आपल्याच माणसाच्या दुराव्याचा...

- भक्ती आजगांवकर 

6 comments:

 1. वाह....

  आपल्या मालकीच्या आपल्या खिडकीचा..
  त्यातल्या धावत्या चित्रासकट पुढे उलगडणाऱ्या प्रवासाचा...
  गाडीपेक्षाही अधिक वेगात धावणाऱ्या मनाचा...
  अन तरीही मागे सोडून आलेल्या आपल्याच माणसाच्या दुराव्याचा...

  जबरदस्त आणि एकदम मनातलं लिवलंय म्याडम :) :)

  ReplyDelete
 2. आभार सुहास... :)

  ReplyDelete
 3. मी पण आले असते ग सोबत तुझ्या.............मस्तच वर्णन!
  जाऊ पण एकदा जमले तर नक्की...........काय म्हणतेस?

  ReplyDelete
 4. :)
  नक्की श्रिया... साधेसे घर आहे.. पण स्वागत मनापासून... :)

  ReplyDelete
 5. आम्ही कोकणी आंम्ही भाग्यवान ...... :) खूप बरं वाटला... पण भक्ती असा नाही चालणार सगळे फोटो हवेत.... पिकासा लिंक प्लीज

  ReplyDelete
 6. खरे आहे गुरु ... भाग्यवान आपण...
  अन फोटो या वेळेस फार कमी काढले...
  अन पुढच्या भागांमध्ये येताहेत अजून फोटो वर्णनासकट.. :)

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!

  ReplyDelete