Thursday, May 31, 2012

गाठ - एक ओवी !!पहिली माझी गाठ, 
गाठ देवापायी..
माया असू द्यावी,
लेकीवरी ..!!

धागा धागा मऊ,
रंग रंगांचा खेळ.. 
आयुष्याचा वेळ,
जात असे..!! 

संस्काराची शिदोरी,
भावनांसी ओढी.. 
नात्यांची या गोडी,
जन्मजात ..!!

विणण्यात हात मग्न, 
धागे उभे नि आडवे.. 
गाई ईशाचे गोडवे,
मुख सदा..!!  

मनी रंग उजळ,
विणावा सुखाचा..  
गहिरा दुखा:चा,
असू द्यावा..!! 

गाठ गाठ जोडी,
धागे अपुऱ्या श्वासाचे.. 
सकल आयुष्याचे, 
महावस्त्र ..!!

कधी तुटला संपला, 
कधी गुंतला स्वत:त..
जप कौशल्य हातात, 
जोडण्याचे..!! 

कधी चुके टाका, 
चुकतेची कधी वीण ..
उसवुनी पुन्हा शिवण,
सावरावे..!! 

गाठ गाठ अशी,
उकलावी नीट..
नको निरगाठ,
आयुष्याची..!! 

भक्ती आजगावकर 


प्रकाशचित्रातील विणकाम स्वत: केलेले ..अन भरतकाम मातोश्रीनी :) 

14 comments:

 1. अरे वा ब्लॉग बाळावर ओवी आली की! स्तुत्य प्रयोग!
  ओव्या आवडल्या!
  च्या-मारी(बिस्किटांसाठी तो हायफन), ह्यात विणकाम कुठल् आणि भरतकाम कुठल् (बाकी काकूंच्या हातात जादुये मात्र)

  ReplyDelete
 2. गाठ गाठ अशी,
  उकलावी नीट..
  नको निरगाठ,
  आयुष्याची..!!


  व्वा व्वा.... निव्वळ अप्रतिम.

  खूप दिवसांनी/महिन्यांनी पोस्ट आलीय, आता रेग्युलर येऊ देत :) :)

  ReplyDelete
 3. अप्रतिम modern युगातली संत भक्ती

  ReplyDelete
 4. धन्यवाद सुहास..

  अभिषेक...विणकाम अन भरतकाम कळत नाही म्हणे..अन तरी जादू आईच्या हाताला... हे भारी आहे

  प्रदीप :D ..संत काय .. :)

  ReplyDelete
 5. सुंदर रचना !! :)
  तुझे विणकाम आणि काकूंनी केलेले भरतकाम मस्तच ! :)

  ReplyDelete
 6. :)
  आभार श्रिया..

  ReplyDelete
 7. धुंद मनाच्या बेधुंद ,बेभान भावनांचे संकलन करणारी कविता आहे.

  ReplyDelete
 8. WAAAAHHHHHHH..................! mast ovi ....! sundar !

  ReplyDelete
 9. उहू निनाद ...
  खरेतर जात्याचे खुंटा पकडून पकडून घट्टे पडलेल्या हाताने अन पोक्त वयाने आळवलेली अशी ती ओवी वाटते मला... !!!

  :)

  ReplyDelete
 10. mast kelya shabdancha kheli
  navya yugatli navi ovi
  taral manachi spandane
  ukalu pahatat
  nirgadh bhavnanchi

  ReplyDelete
 11. प्रतिसादाबद्दल धन्यवाद गोविंद !!! ...
  अन ब्लॉग वर स्वागत ... अभिप्राय.. सूचना.. दोन्ही आवर्जून द्या.. !!

  ReplyDelete
 12. विणकाम, भरतकाम अन ओवी यांची गुंफण भारीच गोड आहे गं! :)

  ReplyDelete