Tuesday, August 23, 2011

श्यामा


दु:ख दाटते रोमरोमी
अंधार दाटतो गात्री
"श्यामा" झाली राधा
सोसुनी श्याम विरही रात्री !!!

शाम विरही रात्रीचा
अवघा एक सहारा
अंधार सारा मनात
नयनात शुक्र तारा ... !!!

शुक्र तारा बोलतो
आस हि मोडू कशी.. .
श्वास या हृदयी जसा
मुरली धून भिनली तशी !!

धून एक अंतरी
कृष्ण कृष्ण कृष्ण नाम ..
विसरले कालिंदी ला
विसरले गोकुळ ग्राम !!


नित्य गोकुळी आता
कृष्ण रास चालतो ..
भक्तीच्या ऋणी कान्हा
नाव राधाकृष्ण लावितो !!!

- भक्ती आजगावकर


छायाचित्र आंतरजालाहून साभार!! 



8 comments:

  1. khup khup khup sundar wah bhakti khupach sundar aahe

    ReplyDelete
  2. वाह... छानच लिहील आहेस! :)

    ReplyDelete
  3. धन्यवाद अक्षय न अभिषेक.. !!!
    :)

    ReplyDelete
  4. सुंदरच... आवडलं...

    ReplyDelete
  5. धन्यवाद दवबिंदू न मिलिंद...

    ReplyDelete
  6. आणखीन एक भावपूर्ण कविता...:) भक्ती.
    राधा,कृष्णाची भक्ती करत होती आणि हे नाते ह्या कवितेतून सुरेख मांडले आहेस.....आणि हे चित्र माझे आवडीचे आहे....

    ReplyDelete
  7. धन्यवाद श्रिया...
    कृष्ण हा सखाच... सदाच भुलवतो...
    शब्द संपले तरी त्याचे कौतुक पुरे होत नाही ...
    अन मनातून त्याची आस कमी होत नाही .. :)

    त्याच्या निळाईची अजून एक भूल इथे वाच ...
    http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/06/blog-post_12.html

    ReplyDelete