एक गच्च श्वास, रातराणी माझ्या हृदयात..
नितळ दरवळ रातीचा, काहूर काळ्या डोहात..!!
थेंब
थेंब
ओसंडे
एकच
प्याला
जगण्याचा..
खारी
चव
या
दु:खाची
उचंबळे
अंतरात..!!
सांडले
आयुष्य
सारे
उघडल्या
पापण्यात..
पृथ्वीव्यापी दु:ख माझे मावेना या नभात..!!
पृथ्वीव्यापी दु:ख माझे मावेना या नभात..!!
पलीकडील
नाद
येई,
अनाहत
चांदरात..
एक याद एक साद प्रतिसाद माझ्या उरात..!!
एक याद एक साद प्रतिसाद माझ्या उरात..!!
सुकुमार
स्पर्शलेले
निळेशार
भवताल..
निराकार धार धरून जीवन रिक्त घटात..!!
निराकार धार धरून जीवन रिक्त घटात..!!
गंध
चव
दृष्टी
श्रवण
स्पर्श
या
संवेदना..
भोग
प्राक्तनाचे
एकवटुनी
मर्त्य
देहात..!!
- भक्ती आजगांवकर
सुलेखन सौजन्य : निखील ... (अश्यातश्या कल्पना सांगून अन चारपाचदा काम करायला लावूनसुद्धा ना कंटाळता करून देणे हे सौजन्य... अन हे असे करायला लागणे हे त्यांचे प्राक्तन :P)
नि:संशय अप्रतिम..
ReplyDeleteइंद्रियांची हृदयातल्या भावनांमुळे निष्कारण तगमग होते,
काहूर उठते....
भोग प्राक्तनाचे एकवटुनी मर्त्य देहात..!!
ReplyDeleteसुंदर !
waaah
ReplyDeleteयोग ... अनघा अन निखील.. धन्यवाद :)
ReplyDeleteओतप्रोत भरली आहे. मर्त्य नसलेल्या त्या दगडाच्या देवाला नाही कळणार सं-वेदनांच गणित. आता दगड बनून छान की देह बनून, हा ज्याच्या त्याच्या आकर्षणाचा भाग.
ReplyDeleteबाकी त्या रातराणीशी काय झगडा आहे काय माहित!
:)
Deleteअनामिक... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
दगडाचे प्राक्तन त्याचे त्याला ठाऊक... देव का दानव हे सुद्धा... अन संवेदना की नुसतीच वेदना हे सुद्धा ...
पण रातराणीशी कसले भांडण... तिला तर हृदयातच स्थान ...
:)
सखी...खुप सुंदर..छान लिहीलय..मनापासुन आवड्लं..
ReplyDeleteराज .. ब्लॉगवर स्वागत.. अन प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. :)
Delete_/\_ _/\_ _/\_ !!!
ReplyDelete:) सुहास ...
Deleteइतक्यात नका बाबा असे करू.. :P
अरे शब्देविण संवादू काय ते म्हणतात नं...त्येच ते :) :)
Deleteअसं मस्त मस्त लिहितेयस, की पुढे काही बोलायला शिल्लक नाही ठेवत तू....
:)
Deleteतुम्हा साऱ्यांचा संगतीचा परिणाम... अजून काय :)
Masatach...
ReplyDeleteDeeps... :)
Delete